बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना 2024

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना : महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, या मंडळामार्फत बांधकाम कामगारांना मध्यान भोजन योजना ही सुरू केली आहे. या मध्यान भोजन योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दोन वेळेस सकस आहार दिला जातो. या मध्यान्ह भोजन सकस आहारामध्ये भाजी, चपाती, भात, डाळ, लोणचे आणि गुळ हा आहार दिला जात आहे.

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना : महाराष्ट्र राज्यामध्ये कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. बांधकाम कामगार हे कामानिमित्त वेगवेगळे ठिकाणी स्थलांतरित होत असतात. बांधकाम कामगार मध्ये संख्या ही ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर आहे. ग्रामीण भागातील कामगार हे स्थलांतरित मोठ्या प्रमाणावर शहरी भागात होत असतात. या ठिकाणी आल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित नसते तसेच जेवण त्यांना व्यवस्थित मिळत नाही.

बांधकाम कामगार यांचा जास्त वेळ हा कामाच्या ठिकाणी जात असतो. त्यांची दिनचर्या ही सकाळपासून सुरुवात होत असते आणि संध्याकाळपर्यंत हे काम चालू असते. काम हे जडिपाचे असल्याकारणाने त्यांना व्यवस्थित जेवण बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. जेवण व्यवस्थित मिळत नसल्याने त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. आणि त्यांना जी मजुरी मिळते ती खूपच अत्यल्प असते. या कारणामुळे बांधकाम कामगारांमध्ये मोठे कुपोषणाचे प्रमाण सापडलेले आहे.

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना bandhakam-kamagar-madhyanh-bhojan-yojana
बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना bandhakam-kamagar-madhyanh-bhojan-yojana

ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने ‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करून या बांधकाम कामगारांना दोन वेळेस सकस आहार त्यांच्या कामाच्या ठिकाणी मिळावा यासाठी ‘ बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना ‘ या योजनेची सुरुवात केली. या बांधकाम कामगार मध्यान भोजन योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना आता चालू कामाच्या ठिकाणी दोन वेळचे सकस आहार दिला जातो.

दिवसातून हा आहार दोनदा दिला जातो. हा सकस आहार घेऊन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांची गाडी ही बांधकाम कामगाराच्या कामास ठिकाणी जात असते. मध्यान्ह भोजन घेऊन ही गाडी सकाळी १०:३० ते १२:०० दरम्यान एकदा येते. त्यानंतर हीच गाडी त्याच दिवशी सकस आहार जेवण घेऊन ०४:३० ते ०६:०० च्या दरम्यान येते.

बांधकाम कामगाराची गाडी ही शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी तुमच्या साईटचे काम चालू आहे त्या ठिकाणी जाते. किंवा तुम्ही जर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येत असाल तर ही गाडी जेवण घेऊन तुमच्या ग्रामपंचायत मध्ये येते. त्या ठिकाणी तुम्ही दोन जेवण घेऊ शकता.

बांधकाम-कामगार-मध्यान्ह-भोजन-योजना
बांधकाम-कामगार-मध्यान्ह-भोजन-योजना

जर बांधकाम कामगार असाल, तर मध्यान्ह भोजन योजनेसाठी तुम्ही मंडळाकडे अर्ज करू शकता. अर्ज करण्याची पद्धत खूप सोपी आहे. ज्या ठिकाणी 5 ते 15 कामगार काम करत असतील तर त्यांनी ग्रुपमध्ये जाऊन मंडळाकडे मध्यान भोजन योजने संदर्भात अर्ज जमा करायचा आहे. त्यानंतर अगदी पाच ते दहा दिवसाच्या आत तुमच्याशी संपर्क साधून ही गाडी मध्यान भोजन सकसार घेऊन त्या साइटवर येईल. अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. काही महत्त्वाच्या कागदपत्रासह तुम्ही मध्यान भोजन योजना यासाठी मंडळाकडे अर्ज करू शकता.

  • बांधकाम कामगाराचे कार्ड
  • आधार कार्ड
  • नूतनीकरण झाले असेल तर नूतनीकरण पावती
  • मोबाईल नंबर
  • ग्रामपंचायत हद्दीमध्ये असाल ग्रामपंचायत चे मध्यान भोजन चालू होण्यासंदर्भात ठराव सर्वांच्या सहीने.
  • जर काम साइटवर असेल, ठेकेदार या मार्फत असेल अथवा काम हे इंजिनियर मार्फत असेल तर सर्व कामगारांची यादी आणि त्यावर त्या इंजिनियर ची सही आणि शिक्का आणि काम कोठे चालू आहे त्या संदर्भात तपशील.
  • स्वयंघोषणापत्र

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना bandhakam-kamagar-madhyanh-bhojan-yojana
बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना bandhakam-kamagar-madhyanh-bhojan-yojana

बांधकाम कामगार मध्यान भोजन योजना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही नियम व अटी आहेत ते खालील प्रमाणे

  • मध्यान्ह भोजन योजना हा लाभ मिळवण्यासाठी बांधकाम कामगार व इतर कामगार म्हणून त्यांची नोंद ही महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाकडे झालेली असावी.
  • मध्यान्ह भोजन योजना मिळवण्यासाठी त्या बांधकाम कामगाराकडे ‘ मंडळाचे स्मार्ट कार्ड असावे ‘.
  • मध्यान्ह भोजन योजना मिळवण्यासाठी त्या बांधकाम कामगाराकडे आधार कार्ड असावे.
  • मध्यान्ह भोजन योजना मिळवण्यासाठी बांधकाम कामगाराची ‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे ‘ नोंदणी ही सक्रिय असावी.
  • मध्यान्ह भोजन योजना मिळवण्यासाठी बांधकाम कामगार हा कोणत्यातरी साइटवर कामाला पाहिजे.
योजनेचे नाव बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना
योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या मार्फत
लाभ दोन वेळचे बांधकाम कामगारांना जेवण
खर्च काहीच नाही
अर्जबांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना चालू करण्यासाठी अर्ज येथे मिळवा
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. रेशन कार्ड
  4. 90 दिवसाचे ग्रामसेवक अथवा ठेकेदाराचे प्रमाणपत्र

Leave a Comment