bandhkam kamgar yojana diwali bonus : नमस्कार बांधकाम कामगार बंधूंनो, महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री श्री सुरेश खाडे सरांनी यावर्षी म्हणजे 2024 मध्ये जे बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत तसेच सक्रिय आहेत अशा बांधकाम कामगारांना एक सानुग्रह अनुदान पाच हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
दिवाळीच्या मुहूर्तावर मंजूर केले म्हणून आपण याला दिवाळी बोनस सुद्धा म्हणू शकतो. ज्या बांधकाम कामगारांनी मंडळाकडे नोंदणी केली आहे तसेच ज्यांचे बांधकाम कामगाराचे कार्ड सक्रिय आहेत अशा सर्व बांधकाम कामगारांना यावर्षी दिवाळी बोनस दिला जाणार आहे. हा दिवाळी बोनस रक्कम 5,000 रुपये प्रत्येक कामगार असणार आहे.
bandhkam kamgar yojana diwali bonus : हा बोनस कधी मिळणार त्यासाठी अटी व शर्ती काय याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.

पाच हजार रुपये दिवाळी बोनस कोणाला मिळणार ?
bandhkam kamgar yojana diwali bonus : महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री श्री सुरेश खाडे यांनी दोन दिवसापूर्वी या बोनसची घोषणा केली. यामध्ये त्यांनी काही पॉईंट मांडले आहेत ते खालील प्रमाणे
- यावर्षी बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये बोनस दिला जाणार आहे.
- यासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी ही महामंडळाकडे पाहिजे.
- जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत, त्यांची नोंदणी ही जीवित व सक्रिय असावी.
- आणि ज्यांची नोंदणी ही जीवित व सक्रिय आहे अशा सर्व बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस दिला जाणार आहे.
बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता ?
- नोंदणीकृत बांधकाम कामगार कार्ड
- आधार लिंक बँक पासबुक किंवा बँक पासबुक
- आधार कार्ड.
बांधकाम कामगार दिवाळी बोनस उद्दिष्टे
- बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देणे मागे महत्त्वाचे वैशिष्ट्ये आहेत. दिवाळी हा सण वर्षातून एकदाच असल्याने तसेच अति महत्त्वाचा सण असल्याने प्रत्येक बांधकाम कामगार हा साजरा करत असतो. पण बऱ्याच बांधकाम कामगार यांच्याकडे दिवाळी सणाला आर्थिक पाठबळ असते असेच नाही, त्यामुळे महाराष्ट्र शासन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर प्रत्येक बांधकाम कामगाराच्या बँक खात्यामध्ये एक सानुग्रह अनुदान अर्थात बांधकाम कामगारांना बोनस दिला जातो.
- या दिवाळी बोनस मुळे कामगारांना एक आर्थिक मदत मिळते त्यामुळे ते घर दिवाळीत हा सण कुटुंब सोबत व्यवस्थित साजरा करतात.
- वर्षातून एकदाच हे अनुदान मिळत असते.
बांधकाम कामगार यांना दिवाळी बोनस मिळवण्यासाठी पात्रता तसेच अटी व शर्ती :
- कामगार हा महाराष्ट्र इमारत व तर कामगार महामंडळाकडे नोंदणीकृत असला पाहिजे.
- कामगाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्षाच्या दरम्यान पाहिजे.
- कामगाराने मागील वर्षी कमीत कमी 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काम केलेले पाहिजे.
- कामगाराची नोंदणी ही सक्रिय तसेच जीवित पाहिजे.
- बाहेरच्या राज्यातील जे कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगाराकडे नोंदणीकृत असतील तर त्यांचे महाराष्ट्रातील वास्तविक कमीत कमी 15 वर्षे पाहिजे.
- बांधकाम कामगाराचे आधार लिंक बँक खाते पाहिजे.
- बांधकाम कामगाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- बांधकाम कामगाराचे कार्ड त्या कामगाराकडे असणे आवश्यक आहे.
दिवाळी बोनस मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- कामगाराचे स्मार्ट कार्ड
- कामगारांची नोंदणी ही सक्रिय असलेली पावती
- बँक खाते ( आधार लिंक बँक खाते )
- मोबाईल नंबर
- आणि अर्ज
दिवाळी बोनस मिळवण्यासाठी अर्ज कसा करणार ?
- तुम्हाला जर दिवाळी बोनस मिळवायचा असेल तर खालील पद्धतीने मिळू शकतात
- दिवाळी बोनस अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना तुमचे कामगाराचे स्मार्ट कार्ड, बँक खाते आणि मोबाईल नंबर लागणार आहे.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना तुम्ही दिवाळी बोनस हा पर्याय घेऊन अर्ज करू शकता.