Bandhkam kamgar scholarship yojana : नमस्कार. शासन मार्फत महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात ज्यामध्ये त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
या प्रमुख योजनांचा मुख्य उद्देश बांधकाम कामगारांच्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे आहे
1. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेची वैशिष्ट्ये आणि लाभ याबद्दल माहिती पाहू
i. या साठी पात्रता
- अर्जदाराचे पालक बांधकाम क्षेत्रात नोंदणीकृत असावे तसेच
- कामगारांनी किमान 90 दिवसांचा कामाचा अनुभव असावा आणि
- विद्यार्थ्याने किवा पाल्याने मान्यताप्राप्त शाळा/महाविद्यालयात प्रवेश घेतला असावा.
ii. लाभाचा प्रकार
- शाळा शिक्षणासाठी : 8वी ते 10वीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹2,000-₹3,000 पर्यंत आर्थिक मदत मिळते तसेच
- महाविद्यालयीन शिक्षणासाठी : 12वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशनसाठी ₹5,000-₹25,000 पर्यंत शिष्यवृत्तीमिळते
- उच्च शिक्षणासाठी : वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ₹50,000 किंवा त्याहून अधिक रक्कम मिळते Bandhkam kamgar scholarship yojana
iii. सहाय्य प्रकार
- ट्यूशन फी तसेच परीक्षा फी आणि शैक्षणिक साहित्याचा खर्च यासाठी मदत मिळते
- वसतिगृह किंवा प्रवासाचा खर्च (गरजेनुसार) मिळते
iv. अर्ज प्रक्रिया कशी आहे ?
- शिष्यवृत्ती साठी हा अर्ज कामगार कल्याण मंडळाच्या (Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board) अधिकृत वेबसाइटवर जाऊन करता येतो यासाठी
- आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, कामगार नोंदणी प्रमाणपत्र, शाळेचा प्रवेश पत्र, बँक खाते तपशील इत्यादी
v. तांत्रिक लाभ
- ऑनलाइन प्रक्रिया सोपी व पारदर्शक आहे
- अर्ज केल्यानंतर एक निश्चित वेळेत शिष्यवृत्ती थेट बँक खात्यावर जमा होते
vi. योजनेचे फायदे
- गरीब व मध्यमवर्गीय बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळतो तसेच
- विद्यार्थ्यांना आर्थिक ताण न घेता शिक्षण सुरू ठेवता येते Bandhkam kamgar scholarship yojana
- उच्च शिक्षणासाठी मदतीमुळे कामगारांच्या कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावतो

2. शिष्यवृत्तीचा तपशील काही महत्वपूर्ण
i. पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती
- प्रत्येक वर्षासाठी ₹20,000 शिष्यवृत्ती दिली जाते
- ही शिष्यवृत्ती कामगाराच्या जास्तीत जास्त दोन पाल्यांना आणि नोंदणीकृत पुरुष कामगाराच्या पत्नीला लागू आहे यासाठी
- विद्यार्थ्याने कोणत्याही वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा
ii. MS-CIT अभ्यासक्रमासाठी शुल्क प्रतिपूर्ती दिली जाते
- बांधकाम कामगाराच्या दोन मुलांसाठी MS-CIT अभ्यासक्रमाचा खर्च परतावा दिला जातो त्यासाठी
- प्रमाणपत्र आणि शुल्क पावतीची आवश्यकता असते
iii. इतर फायदे
- गंभीर आजारासाठी ₹1,00,000 पर्यंतची आर्थिक मदत दिली जाते
- प्रसूतीसाठी ₹15,000 ते ₹20,000 मदत दिली जाते
- अपंगत्वासाठी ₹2,00,000 ची आर्थिक मदत दिली जाते
iv. अर्ज प्रक्रिया
- लाभ घेण्यासाठी अर्जदाराने Mahabocw च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज डाउनलोड करावा आणि
- आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून नजीकच्या श्रम आयुक्त कार्यालयात जमा करावा
- कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, कामगार नोंदणी प्रमाणपत्र, बँक पासबुक, आणि शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची पावती त्यासाठी आवश्यक आहे
v. बांधकाम कामगार या साठी पात्रता काय आहे ?
- अर्जदार किंवा पालकाने Mahabocw बोर्डामध्ये नोंदणी केलेली असावी
- कामगाराने मागील 12 महिन्यांमध्ये किमान 90 दिवस काम केलेले असावे
- त्याच्याकडे बँक पासबुक आणि आधार कार्ड असावे
3. बांधकाम कामगार ला तसेच त्याच्या पत्नीस प्रसूतीसाठी ₹15,000 ते ₹20,000 मदत दिली जाते
महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी किवा त्याच्या गर्भवती पत्नीस आर्थिक मदत MAHABOCW (Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board) अंतर्गत दिली जाते
या योजनेंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन जिवंत मुलांसाठी खालील प्रमाणे आर्थिक मदत मिळते
- सामान्य प्रसूतीसाठी ₹15,000 ची मदत मिळते
- सिझेरियन प्रसूतीसाठी ₹20,000 ची मदत मिळते
i. हा लाभ घेण्यासाठी अटी व पात्रता पहा
- लाभार्थी महिला बांधकाम कामगार म्हणून MAHABOCW कडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे तसेच
- नोंदणीसाठी मागील 12 महिन्यांत किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे सोबत फॉर्म भरताना
- अर्जासोबत वैद्यकीय आणि नोंदणीचे आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे