बांधकाम कामगार योजना 2025

Bandhkam Kamgar Yojana : नमस्कार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी केल्यानंतर तसेच तुम्हाला एक स्मार्ट कार्ड आणि पावती मिळते, हे सर्व मिळाल्यानंतर तुम्ही कामगार मंडळाकडे लाभाच्या अर्ज साठी अर्ज करू शकता किंवा कामगार मंडळामार्फत जे योजना आहेत त्याच्यासाठी अर्ज करू शकता.

आता या योजना कोणकोणत्या आहेत त्या आपण पाहू प्रामुख्याने याच्यामध्ये सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक योजना, आर्थिक योजना आणि आरोग्य विषयक योजना याबाबत. या योजनेबद्दल आपण माहिती पाहू

बांधकाम कामगार सामाजिक सुरक्षा योजना

  • बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्ती साठी 30,000 रुपये दिले जातात.
  • बांधकाम कामगारांना मध्यान्न भोजन योजना दिली जाते यामध्ये दिवसातून दोनदा हे भोजन दिले जाते.
  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही योजना बांधकाम कामगारांना दिली जाते
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही योजना बांधकाम कामगारांना दिली जाते
  • पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना ही योजना बांधकाम कामगार यांना दिली जात आहे

बांधकाम कामगार शैक्षणिक योजना

बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांसाठी तसेच पती किंवा पत्नीसाठी या योजना आहेत त्या खालील प्रमाणे

  • बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्य जर इयत्ता 1 ते 7 वीच्या दरम्यान शिकत असतील तर त्यांना प्रतिवर्षी प्रतिपाल्य 2500 रुपये दिले जात आहेत.
  • बांधकाम कामगाराचे दोन पाल्य जर इयत्ता 8 वी ते 10 वी यादरम्यान शिकत असतील तर त्यांना प्रतिवर्षी प्रतिपाल्य हे 5000 रुपये मिळत आहेत.
  • बांधकाम कामगाराचे दोन पाल्य जर इयत्ता अकरावी व बारावीला शिकत असतील तर त्या दोन पाल्यांना प्रतीवर्षी प्रतिपाल्य वार्षिक 10,000 रुपये दिले जात आहेत.
  • बांधकाम कामगारांचे पहिले 2 पाल्य जर इयत्ता 10 वी आणि 12 वीला शिकत असतील तर त्यांना इयत्ता 10 वी आणि 10 वी मध्ये किमान 50 टक्के पेक्षा गुण किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर त्या दोन्ही पाल्यांना 10,000 रुपये अधिक चे दिले जात आहेत.
  • बांधकाम कामगारांचे पहिले दोन पाल्य किंवा पती-पत्नी हे पदवीसाठी शिकत असतील तर त्यांना वार्षिक 20,000 रुपये दिले जातात.
  • बांधकाम कामगारांचे पहिले 2 पाल्य किंवा पती-पत्नी हे जर इंजिनिअरिंगला शिकत असतील तर त्यांना प्रतिवर्षी 60,000 रुपये दिले जात आहेत.
  • बांधकाम कामगारा चे पहिले 2 पाल्य किंवा पती-पत्नी यापैकी जर मेडिकलला शिकत असतील तर त्यांना वार्षिक 1,00,000 रुपये दिले जात आहेत.
  • बांधकाम कामगाराचे पहिले दोन पाल्य किंवा पती तसेच पत्नी जर ग्रॅज्युएशन नंतर शिकत असतील किंवा आपण पदव्युत्तर पदवी मध्ये शिकत असतील तर त्यांना वार्षिक 25,000 दिले जात आहेत.
  • बांधकाम कामगारांचे पहिले दोन पाल्य तसेच पती पत्नी जर यांनी एम एस सी आय टी MSCIT कोर्स केला असेल तर त्यांना झालेला खर्च परत मिळतो
  • बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना व ह्या- पुस्तके खर्च यासाठी 20,000 रुपये दिले जात आहेत.
Bandhkam kamgar yojana mahabcow
Bandhkam kamgar yojana mahabcow

बांधकाम कामगार यांना आरोग्य विषयक योजना

बांधकाम कामगारांना तसेच त्यांच्या पाल्यांना आरोग्यविषयक योजना आहेत ज्याचा फायदा ते घेऊ शकतात त्या खालील प्रमाणे

  • बांधकाम कामगाराची पत्नी तसेच जर कामगार म्हणून महिला असेल तर तिला नैसर्गिक प्रसूती खर्च 15,000 रुपये बांधकाम कामगार मंडळा मार्फत दिले जातात.
  • बांधकाम कामगाराच्या पत्नीसाठी किंवा जर बांधकाम कामगार म्हणून एखादी महिला नोंदणीकृत असेल तर तिची जर शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाली असेल तिला 2 पाल्यांसाठी 20,000 रुपये दिले जातात.
  • नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांनामहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू आहे.
  • बांधकाम कामगारां ची मोफत आरोग्य तपासणी वार्षिक केली जात आहे.
  • जर बांधकाम कामगाराला एखादा गंभीर आजार झाला तर त्याला उपचारार्थ 1,00,000 रुपये त्याला तसे त्याच्या कुटुंबियांना दिले जातात.
  • जर बांधकाम कामगाराचे काम करताना 75% अपंगत्व आले तर त्याला 2,00,000 रुपया ची मदत केली जाते.
  • तसेच बांधकाम कामगारांना आता काहीही हॉस्पिटल आहेत तिथे गेल्यानंतर त्यांचा सर्व दवाखान्याचा खर्च ते हॉस्पिटल करणार आहे त्यासाठी तुमच्याकडे चालू बांधकाम कामगारांचे कार्ड पाहिजे तसेच आरोग्य तपासणी केलेली पाहिजे तुमच्या सर्व खर्च तेथे मोफत होणार आहे.

बांधकाम कामगार यांना दिले जाणाऱ्या आर्थिक योजना

बांधकाम कामगारांना त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण आर्थिक योजना दिलेले आहेत त्याबद्दल आपण माहिती खाली पाहू