कामगार योजना शिष्यवृत्ती : बांधकाम कामगारांच्या मुलांना इयत्ता 10 वी व 12 वीमध्ये जर विद्यार्थ्याने किमान 50 टक्के गुण मिळाल्यास 10,000/- रुपयांचे आर्थिक मदत कामगार मंडळाकडून दिली जाते. bandhkam kamgar yojana scholarship
उद्दिष्ट
- बांधकाम कामगारांच्या मुलांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन तसेच मदत देणे.
- कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात पैशांची अडचण येवू नये, यासाठी सहाय्य प्रदान करणे.
योजनेचे वैशिष्ट्य
- या योजनेतून लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम थेट कामगाराच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) द्वारे जमा केली जाते.
लाभार्थी
- बांधकाम क्षेत्रात काम करत असलेल्या कामगारांची मुले किवा अपत्य.
प्रोत्साहन रक्कम
- 10,000 रुपयांचे आर्थिक मदत.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता व अटी
- कामगार संबंधित इमारत बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत असावा आणि जिवंत असावा किवा त्याचे कामगाराचे कार्ड सक्रीय असावे.bandhkam kamgar yojana scholarship
- विद्यार्थ्याला इयत्ता 10 वी मध्ये किमान 50% व इयत्ता 12 वी मध्ये किमान 50% गुण मिळवले पाहिजेत.
- विद्यार्थी सरकारी शाळेत शिक्षण घेत असावा.
- प्रायव्हेट शाळांमध्ये शिकणाऱ्या बांधकाम कामगाराच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी पाल्याला अर्ज करणे आवश्यक आहे.
- ही योजना केवळ महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी आहे बाहेरच्या राज्यातील मुलांसाठी येथे अर्ज करता येणार नाही.
आवश्यक कागदपत्रे
- कामगाराचे आधार कार्ड.
- कामगाराचे कामगार मंडळात नोंदणी प्रमाणपत्र.
- पाल्याची शैक्षणिक गुणपत्रिका यामध्ये १० व १२ वी उतीर्ण गुणपत्रिका, बोनाफाईड, आधार कार्ड, रेशन कार्ड, ओळख पत्र.
- कामगाराच्या बँक खात्याची माहिती. bandhkam kamgar yojana scholarship
- पाल्याचे शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र (बोनाफाईट प्रमाणपत्र).
अर्ज कसा करावा
- कामगारांना अर्ज डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जावे लागेल.
- अर्जामध्ये मागवलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रांसोबत संबंधित कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- याच प्रकारे अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल