बांधकाम कामगार नवीन नोंदणी Workers Registration

बांधकाम कामगार नवीन नोंदणी Bandhkam Kamgar registration : महाराष्ट्र मध्ये कामगार संदर्भात विविध जनगणना झालेले आहेत. सन 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात 14.09 लाख ( अंदाजे ) बांधकाम मजूर आहेत. सन 2001 नुसार जर राज्यामध्ये 14.09 लाख बांधकाम कामगार असतील तर 2011 मध्ये ही संख्या 17.50 लाख एवढे झाले असणार आहे. अर्थात 2021 मध्ये ही संख्या 25 ते 30 लाख झाली असणार आहे.

बांधकाम कामगार नवीन नोंदणी Bandhkam Kamgar registration : महाराष्ट्र राज्यामध्ये 2001 जनगणनेनुसार जर 14.09 लाख बांधकाम कामगार असतील तर या कामगारासाठी कल्याणकारी योजना राबवणे हे राज्य शासनाचे तसेच सत्ताधाऱ्यांचे प्रथम कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी योजना राबवणे तसेच समस्या सोडवण्यासाठी 1 मे 2011 रोजी कामगार दिनाचे औचित्य साधून ‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ‘ याची स्थापना केली.

बांधकाम कामगार नवीन नोंदणी bandhkam-kamgar-registration

महाराष्ट्र मध्ये 2016 अखेर 5.65 लाख बांधकाम कामगार मंडळाकडे लाभार्थी म्हणून नोंदणी झालेली आहे. आता यामध्ये 2024 पर्यंत 28 ते 35 लाख लाभार्थ्यांची नोंदणी मंडळाकडे झाली आहे. यापैकी 15 ते 20 लाख एवढी सक्रिय नोंदणी आहे.

Bandhkam Kamgar registration Eligibility : बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण पात्रतेची आवश्यकता आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. फक्त बांधकाम कामगारांनाच यामध्ये नोंदणी करता येणार आहे. जे बांधकाम कामगार नाहीत त्यांनी या ठिकाणी नोंदणी करू नये. खालील प्रमाणे महत्त्वाचे निकष आहेत

  1. बांधकाम कामगारांचे वय हे 18 ते 60 वर्ष या दरम्यान पाहिजे.
  2. मागील वर्षी म्हणजे मागील 12 महिन्यांमध्ये बांधकाम कामगाराने 90 दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेले पाहिजे.
महाराष्ट्र कामगार नोंदणी Maharashtra worker registration mahabocw

बांधकाम कामगार नवीन नोंदणी Bandhkam Kamgar registration Document : बांधकाम कामगार नवीन नोंदणीसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

  1. अर्ज
  2. वयाचा पुरावा -आधार कार्ड/पॅन कार्ड
  3. रहिवासी पुरावा – आधार कार्ड/ रेशन कार्ड
  4. पासपोर्ट साईज चे 3 फोटो.
  5. 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र.

नोंदणी फी म्हणून 01 रुपया व वार्षिक वर्गणी 01 रुपया

bandhkam kamgar registration new

बांधकाम कामगार नवीन नोंदणी Bandhkam Kamgar registration Contact information : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे तुम्ही खालील प्रमाणे संपर्क करू शकता.

  • दूरध्वनी क्रमांक : 022 2657 2631 / 022 2657 2632
  • ई-मेल आयडी : bocwwboardmaha@gmail.com / info@mahabocw.in
  • टोल फ्री क्रमांक : ( सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत ) : 1800 8892 816
  • संपर्क कार्यालय : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ( पाचवा मजला, एम एल टी सी हाऊस, प्लॉट C- 22, ई ब्लॉक , वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे ( पूर्व ), मुंबई 400051, महाराष्ट्र
Bandhkam Kamgar Yojana
bandhkam kamgar registration online
bandhkam kamgar registration online
bandhkam kamgar registration online

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version