- बांधकाम व दुरुस्ती कार्य
- इमारती
- रस्ते आणि रेल्वे
- एअरफील्ड
- ट्रामवेज
- सिंचन आणि ड्रेनेज
- विशेष प्रकारची बांधकामे
- तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स
- स्टॉर्म वॉटर ड्रेनेज
- डॅम, नद्या, व नाशक संरचना
- ऊर्जा आणि दळणवळण प्रकल्प
- पॉवर वितरण आणि पारेषण
- पाणी वितरणासाठी चॅनल
- तेल आणि गॅस पाईपलाइन
- वायरलेस, दूरदर्शन, इलेक्ट्रिक लाईन्स, रेडिओ
- टेलीफोन, टेलीग्राफ, ओव्हरसीज कम्युनिकेशन्स Bandhkam Kamgar list
- प्रमुख बांधकामे
- टनेल, पुल, जलविद्युत प्रकल्प
- ट्रान्समिशन टॉवर्स, कूलिंग टॉवर्स
- मजुरी व शिल्प कार्य
- दगड कापणे, फोडणे व चुरा तयार करणे
- लादी व टाईल्स कापणे आणि पॉलिश करणे
- सजावटीचे व अंतर्गत काम
- रंगकाम, वॉर्निश व सुतारकाम
- काच कापणे, तावदाने बसविणे
- प्लास्टर ऑफ पेरीस व आभासी छत बसविणे
- विद्युत आणि यांत्रिक कामे
- वितरण, वायरिंग, तावदान बसविणे
- अग्निशमन आणि वातानुकूलन यंत्रणा बसविणे व दुरुस्ती
- उद्वाहने व स्वयंचलित जिने बसविणे
- लोखंड व धातूशी संबंधित कार्य
- खिडक्या, ग्रिल्स, दरवाजे तयार करणे व बसविणे
- जलसंधारण आणि जलस्रोत प्रकल्प
- जलसंचयन संरचना व जलतरण तलाव
- मनोरंजन आणि सुविधा निर्माण
- खेळाचे मैदान, गोल्फ मैदान
- सार्वजनिक उद्याने व रमणीय भू-प्रदेश
- विशेष यंत्रणा व उपकरणे
- सौर तावदाने व ऊर्जाक्षम उपकरणे
- माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवासी निवारे
- अन्य विशेष कार्य
- रोटरीज बांधणे, कारंजे बसविणे
- सिमेंट काँक्रीट साचे तयार करणे
Tag: Bandhakam kamgar madhanya yojana
बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना 2024
बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना : महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, या मंडळामार्फत बांधकाम कामगारांना मध्यान भोजन योजना ही सुरू केली आहे. या मध्यान भोजन योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दोन वेळेस सकस आहार दिला जातो. या मध्यान्ह भोजन सकस आहारामध्ये भाजी, चपाती, भात, डाळ, लोणचे आणि गुळ हा आहार दिला जात आहे.
बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना : महाराष्ट्र राज्यामध्ये कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. बांधकाम कामगार हे कामानिमित्त वेगवेगळे ठिकाणी स्थलांतरित होत असतात. बांधकाम कामगार मध्ये संख्या ही ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर आहे. ग्रामीण भागातील कामगार हे स्थलांतरित मोठ्या प्रमाणावर शहरी भागात होत असतात. या ठिकाणी आल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित नसते तसेच जेवण त्यांना व्यवस्थित मिळत नाही.
बांधकाम कामगार यांचा जास्त वेळ हा कामाच्या ठिकाणी जात असतो. त्यांची दिनचर्या ही सकाळपासून सुरुवात होत असते आणि संध्याकाळपर्यंत हे काम चालू असते. काम हे जडिपाचे असल्याकारणाने त्यांना व्यवस्थित जेवण बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. जेवण व्यवस्थित मिळत नसल्याने त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. आणि त्यांना जी मजुरी मिळते ती खूपच अत्यल्प असते. या कारणामुळे बांधकाम कामगारांमध्ये मोठे कुपोषणाचे प्रमाण सापडलेले आहे.
ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने ‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करून या बांधकाम कामगारांना दोन वेळेस सकस आहार त्यांच्या कामाच्या ठिकाणी मिळावा यासाठी ‘ बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना ‘ या योजनेची सुरुवात केली. या बांधकाम कामगार मध्यान भोजन योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना आता चालू कामाच्या ठिकाणी दोन वेळचे सकस आहार दिला जातो.
दिवसातून हा आहार दोनदा दिला जातो. हा सकस आहार घेऊन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांची गाडी ही बांधकाम कामगाराच्या कामास ठिकाणी जात असते. मध्यान्ह भोजन घेऊन ही गाडी सकाळी १०:३० ते १२:०० दरम्यान एकदा येते. त्यानंतर हीच गाडी त्याच दिवशी सकस आहार जेवण घेऊन ०४:३० ते ०६:०० च्या दरम्यान येते.
बांधकाम कामगाराची गाडी ही शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी तुमच्या साईटचे काम चालू आहे त्या ठिकाणी जाते. किंवा तुम्ही जर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येत असाल तर ही गाडी जेवण घेऊन तुमच्या ग्रामपंचायत मध्ये येते. त्या ठिकाणी तुम्ही दोन जेवण घेऊ शकता.
जर बांधकाम कामगार असाल, तर मध्यान्ह भोजन योजनेसाठी तुम्ही मंडळाकडे अर्ज करू शकता. अर्ज करण्याची पद्धत खूप सोपी आहे. ज्या ठिकाणी 5 ते 15 कामगार काम करत असतील तर त्यांनी ग्रुपमध्ये जाऊन मंडळाकडे मध्यान भोजन योजने संदर्भात अर्ज जमा करायचा आहे. त्यानंतर अगदी पाच ते दहा दिवसाच्या आत तुमच्याशी संपर्क साधून ही गाडी मध्यान भोजन सकसार घेऊन त्या साइटवर येईल. अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. काही महत्त्वाच्या कागदपत्रासह तुम्ही मध्यान भोजन योजना यासाठी मंडळाकडे अर्ज करू शकता.
बांधकाम कामगार मध्यान भोजन योजना मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- बांधकाम कामगाराचे कार्ड
- आधार कार्ड
- नूतनीकरण झाले असेल तर नूतनीकरण पावती
- मोबाईल नंबर
- ग्रामपंचायत हद्दीमध्ये असाल ग्रामपंचायत चे मध्यान भोजन चालू होण्यासंदर्भात ठराव सर्वांच्या सहीने.
- जर काम साइटवर असेल, ठेकेदार या मार्फत असेल अथवा काम हे इंजिनियर मार्फत असेल तर सर्व कामगारांची यादी आणि त्यावर त्या इंजिनियर ची सही आणि शिक्का आणि काम कोठे चालू आहे त्या संदर्भात तपशील.
- स्वयंघोषणापत्र
बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना लाभ कोण घेऊ शकतो
बांधकाम कामगार मध्यान भोजन योजना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही नियम व अटी आहेत ते खालील प्रमाणे
- मध्यान्ह भोजन योजना हा लाभ मिळवण्यासाठी बांधकाम कामगार व इतर कामगार म्हणून त्यांची नोंद ही महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाकडे झालेली असावी.
- मध्यान्ह भोजन योजना मिळवण्यासाठी त्या बांधकाम कामगाराकडे ‘ मंडळाचे स्मार्ट कार्ड असावे ‘.
- मध्यान्ह भोजन योजना मिळवण्यासाठी त्या बांधकाम कामगाराकडे आधार कार्ड असावे.
- मध्यान्ह भोजन योजना मिळवण्यासाठी बांधकाम कामगाराची ‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे ‘ नोंदणी ही सक्रिय असावी.
- मध्यान्ह भोजन योजना मिळवण्यासाठी बांधकाम कामगार हा कोणत्यातरी साइटवर कामाला पाहिजे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ माहिती
योजनेचे नाव | बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना |
योजना | महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या मार्फत |
लाभ | दोन वेळचे बांधकाम कामगारांना जेवण |
खर्च | काहीच नाही |
अर्ज | बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना चालू करण्यासाठी अर्ज येथे मिळवा |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
बांधकाम कामगार नवीन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- 90 दिवसाचे ग्रामसेवक अथवा ठेकेदाराचे प्रमाणपत्र
बांधकाम कामगार नवीन नोंदणी Workers Registration
बांधकाम कामगार नवीन नोंदणी Bandhkam Kamgar registration : महाराष्ट्र मध्ये कामगार संदर्भात विविध जनगणना झालेले आहेत. सन 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात 14.09 लाख ( अंदाजे ) बांधकाम मजूर आहेत. सन 2001 नुसार जर राज्यामध्ये 14.09 लाख बांधकाम कामगार असतील तर 2011 मध्ये ही संख्या 17.50 लाख एवढे झाले असणार आहे. अर्थात 2021 मध्ये ही संख्या 25 ते 30 लाख झाली असणार आहे.
बांधकाम कामगार नवीन नोंदणी Bandhkam Kamgar registration : महाराष्ट्र राज्यामध्ये 2001 जनगणनेनुसार जर 14.09 लाख बांधकाम कामगार असतील तर या कामगारासाठी कल्याणकारी योजना राबवणे हे राज्य शासनाचे तसेच सत्ताधाऱ्यांचे प्रथम कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी योजना राबवणे तसेच समस्या सोडवण्यासाठी 1 मे 2011 रोजी कामगार दिनाचे औचित्य साधून ‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ‘ याची स्थापना केली.
महाराष्ट्र मध्ये 2016 अखेर 5.65 लाख बांधकाम कामगार मंडळाकडे लाभार्थी म्हणून नोंदणी झालेली आहे. आता यामध्ये 2024 पर्यंत 28 ते 35 लाख लाभार्थ्यांची नोंदणी मंडळाकडे झाली आहे. यापैकी 15 ते 20 लाख एवढी सक्रिय नोंदणी आहे.
बांधकाम कामगार नोंदणीसाठी पात्रता निकष
Bandhkam Kamgar registration Eligibility : बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण पात्रतेची आवश्यकता आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. फक्त बांधकाम कामगारांनाच यामध्ये नोंदणी करता येणार आहे. जे बांधकाम कामगार नाहीत त्यांनी या ठिकाणी नोंदणी करू नये. खालील प्रमाणे महत्त्वाचे निकष आहेत
- बांधकाम कामगारांचे वय हे 18 ते 60 वर्ष या दरम्यान पाहिजे.
- मागील वर्षी म्हणजे मागील 12 महिन्यांमध्ये बांधकाम कामगाराने 90 दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेले पाहिजे.
बांधकाम कामगार नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे
बांधकाम कामगार नवीन नोंदणी Bandhkam Kamgar registration Document : बांधकाम कामगार नवीन नोंदणीसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
- अर्ज
- वयाचा पुरावा -आधार कार्ड/पॅन कार्ड
- रहिवासी पुरावा – आधार कार्ड/ रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज चे 3 फोटो.
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र.
नोंदणी फी म्हणून 01 रुपया व वार्षिक वर्गणी 01 रुपया
बांधकाम कामगार नोंदणीसाठी अर्ज येथे क्लिक करून डाऊनलोड करा
बांधकाम कामगार महामंडळाकडे संपर्क Mahabocw Contact Info
बांधकाम कामगार नवीन नोंदणी Bandhkam Kamgar registration Contact information : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे तुम्ही खालील प्रमाणे संपर्क करू शकता.
- दूरध्वनी क्रमांक : 022 2657 2631 / 022 2657 2632
- ई-मेल आयडी : bocwwboardmaha@gmail.com / info@mahabocw.in
- टोल फ्री क्रमांक : ( सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत ) : 1800 8892 816
- संपर्क कार्यालय : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ( पाचवा मजला, एम एल टी सी हाऊस, प्लॉट C- 22, ई ब्लॉक , वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे ( पूर्व ), मुंबई 400051, महाराष्ट्र