बांधकाम कामगार योजना सर्व शासन निर्णय Bandhkam Kamgar GR

बांधकाम कामगारांसाठी शासनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत या महत्वपूर्ण निर्णयांद्वारे कामगारांना अनेक नवीन फायदे आणि सहाय्य मिळत आहे Bandhkam Kamgar GR

सरकारचे उद्दिष्ट आहे की बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या जीवनमानात सुधारणा करणे आणि त्यांना योग्य सुविधा देणे चला तर मग या योजनांच्या सर्व शासन निर्णय पहा

योजना शासन निर्णय
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदीत बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबतयेथे क्लिक करा
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घर बांधणीसाठी खरेदी केलेल्या जमिनीच्या खर्चाची प्रतिपूर्ती अर्थसहाय्ययेथे क्लिक करा
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य येथे क्लिक करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने नोंदणीकृत कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजनायेथे क्लिक करा
बांधकाम कामगारांना आवश्यक अवजारे खरेदी करण्यासाठी मंडळाकडून 5000/- रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध येथे क्लिक करा
राज्यातील इमारत व बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना लागू करण्याबाबत.येथे क्लिक करा
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सुरक्षा संच वितरण योजनेला शासनाची मान्यता GRयेथे क्लिक करा
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोदींत पात्र सर्व बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (Safety Kit) पुरविण्याच्या योजनेस शासनाची मंजुरी GR पहा येथे क्लिक करा
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव GRयेथे क्लिक करा
मंडळाकडून नोदींत पात्र बांधकाम कामगारांना आवश्यक अवजारे खरेदीसाठी 5000/- रुपयांचे अर्थसहाय्य देण्याबाबत येथे क्लिक करा
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदीत बांधकाम कामगारांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय GRयेथे क्लिक करा
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदीत बांधकाम कामगारांसाठी आरोग्य व वैयक्तिक अपघात विमा योजना GRयेथे क्लिक करा
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना 1000 रुपये पर्यंत शैक्षणिक उपयोगाची पुस्तके देण्याबाबत निर्णय GRयेथे क्लिक करा
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भेटवस्तू ऐवजी रोख रक्कम देण्याबाबत GRयेथे क्लिक करा
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याबाबत GRयेथे क्लिक करा
महाराष्ट्रातील इमारत व बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना लागू करण्याबाबत GRयेथे क्लिक करा
मंडळाच्या योजनांच्या लाभाच्या रकमेत वाढ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना GRयेथे क्लिक करा
बांधकाम कामगारांना भेटवस्तू ऐवजी रोख रक्कम देण्याबाबतचे धोरण GRयेथे क्लिक करा

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड कसे करावे ? bandhkaam kamgar smart card

भारतामध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी विविध सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी “बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड” हे अत्यंत महत्त्वाचे साधन बनले आहे bandhkaam kamgar smart card

हे बांधकाम कार्ड कामगारांचे ओळखपत्र असून विविध योजना व लाभ प्राप्त करण्यासाठी उपयुक्त ठरते आज आपण या कार्डाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत आणि ते कसे डाउनलोड करायचे याबद्दल माहिती पाहणार आहे

बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड म्हणजे काय ?

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांची नोंद ठेवण्यासाठी तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हे कार्ड उपयोगी आहे हे कार्ड राज्य सरकारच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाद्वारे दिले जाते

स्मार्ट कार्डसाठी आवश्यक अटी व पात्रता

  1. अर्जदार बांधकाम क्षेत्राशी संबंधित काम करत असावा तसेच
  2. अर्जदाराचा वय 18 ते 60 वर्षे या वयोगटात असावे
  3. किमान 90 दिवसांचे काम अनुभव असणे आवश्यक आहे आणि
  4. अर्जदाराने आपल्या राज्याच्या बांधकाम कामगार मंडळात नोंदणी केली असावी bandhkaam kamgar smart card

स्मार्ट कार्ड डाउनलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड (किंवा इतर ओळखपत्र) आणि
  2. कामाचा पुरावा (उदा., पगार पावती किंवा प्रमाणपत्र ) आणि
  3. नोंदणी क्रमांक (State Board Registration Number) आणि
  4. पासपोर्ट साईझ फोटो
bandhkaam kamgar smart card

स्मार्ट कार्ड डाउनलोड करण्याची प्रक्रिया

  1. सरकारी वेबसाइटला भेट द्या : आपल्या राज्यातील बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या ऑफिसियल वेबसाइटला भेट द्या उदाहरणार्थ महाराष्ट्रासाठी mahabocw.in ही अधिकृत वेबसाइट आहे
  2. नोंदणी तपासा : लॉगिन करण्यासाठी नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्रविष्ट करा जर पासवर्ड माहीत नसेल तर ‘पासवर्ड विसरलात ?’ पर्याय वापरून नवीन पासवर्ड या ठिकाणी तयार करू शकता.
  3. स्मार्ट कार्ड पर्याय निवडा : डॅशबोर्डवर “स्मार्ट कार्ड” किंवा “कार्ड डाउनलोड” असा पर्याय दिसेल bandhkaam kamgar smart card तो निवडा
  4. डिटेल्स भरा – तुमचे नाव तसेच जन्मतारीख किंवा आधार क्रमांक यासारखी माहिती प्रविष्ट करा
  5. कार्ड डाउनलोड करा : योग्य तपशील दिल्यानंतर स्मार्ट कार्ड PDF स्वरूपात स्क्रीनवर दिसेल तसेच तुम्ही ते डाउनलोड करून प्रिंट करू शकता

बांधकाम कामगार स्मार्ट कार्डाचे फायदे

  1. शिक्षण आणि आरोग्य सुविधा : कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती व कुटुंबासाठी आरोग्य विमा योजना तसेच
  2. आर्थिक सहाय्य : अपघात विमा, निवृत्ती वेतन, व अन्य आर्थिक मदत तसेच
  3. घरबांधणी अनुदान : घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी अनुदान तसेच
  4. प्रशिक्षण कार्यक्रम : कौशल्यविकास आणि नवीन रोजगार संधींसाठी प्रशिक्षण

कार्ड वापरताना महत्त्वाच्या गोष्टी

i. कार्ड नूतनीकरण

बांधकाम कामगार कार्ड दरवर्षी नूतनीकरण करावे लागते त्यासाठी नियमितपणे नोंदणी क्रमांक वापरून लॉगिन करा

ii. स्मार्ट कार्ड हरवले तर

हरवलेले कार्ड पुन्हा प्राप्त करण्यासाठी तुमच्या राज्याच्या मंडळाकडे संपर्क साधा

ii. नोंदणी बदल

कोणताही बदल जसे की नवीन नोकरीचा पुरावा किंवा कुटुंबातील सदस्यांची माहिती अपडेट करणे गरजेचे आहे

प्रश्न व उत्तरे

i. स्मार्ट कार्ड म्हणजे काय ?

उत्तर : हे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांचे ओळखपत्र आहे हे विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वापरले जाते

ii. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी पात्रता काय आहे ?

उत्तर : अर्जदाराला किमान 90 दिवसांचा बांधकाम अनुभव असावा आणि तो 18 ते 60 वयोगटातील असावा हि पात्रता आहे

iii. बांधकाम कामगार हे कार्ड कोण जारी करते ?

उत्तर : राज्य सरकारचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ हे कार्ड जारी करते

iv. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड करण्यासाठी कोणती वेबसाइट आहे ?

उत्तर : प्रत्येक राज्याच्या अधिकृत मंडळाच्या वेबसाइटवरून हे कार्ड डाउनलोड करता येते, उदाहरणार्थ महाराष्ट्रासाठी mahabocw.in

v. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड साठी कोणती कागदपत्रे लागतात ?

उत्तर : आधार कार्ड तसेच नोंदणी क्रमांक, ९० दिवसाचा कामाचा पुरावा आणि पासपोर्ट साईझ फोटो

vi. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसे डाउनलोड करायचे ?

उत्तर : संबंधित वेबसाइटवर लॉगिन करून डॅशबोर्डमधील “कार्ड डाउनलोड” पर्याय निवडून त्याठिकाणी PDF स्वरूपात ते डाउनलोड करता येते

vii. बांधकाम कामगार हे कार्ड का महत्त्वाचे आहे ?

उत्तर : कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी हे बांधकाम कामगार कार्ड म्हणून हे कार्ड महत्त्वाचे आहे

viii. स्मार्ट कार्ड वापरून कोणते फायदे मिळतात ?

उत्तर : शैक्षणिक शिष्यवृत्ती तसेच आरोग्य विमा, आर्थिक मदत आणि प्रशिक्षण कार्यक्रम

ix. अपघात विमा योजनेचा लाभ कोणाला मिळतो ?

उत्तर : नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हा लाभ मिळतो

x. कार्ड मिळवण्यासाठी किमान अनुभव किती आवश्यक आहे ?

उत्तर : 90 दिवसांचे बांधकाम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आवश्यक आहे

xi. कार्ड नूतनीकरण का महत्त्वाचे आहे ?

उत्तर : सरकारी योजनांचा सातत्याने लाभ मिळवण्यासाठी कार्ड नूतनीकरण गरजेचे आहे

xii. अर्ज प्रक्रिया किती काळ घेते ?

उत्तर : साधारणतः अर्ज प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 15-60 दिवस लागतात

xiii. हरवलेले कार्ड पुन्हा कसे मिळवावे ?

राज्याच्या अधिकृत कार्यालयात जाऊन हरवलेले कार्ड पुन्हा प्राप्त करता येते तसेच त्यासाठी मूळ अर्ज क्रमांकाची पावती आवश्यक आहे

xiv. हे कार्ड किती वर्षांसाठी वैध असते ?

उत्तर : हे कार्ड एक वर्षासाठी वैध असते, त्यानंतर ते नूतनीकरण करून पुन्हा एका वर्षासाठी वैध होते.

xv. कार्ड मिळवण्यासाठी किमान वय किती असावे ?

उत्तर : किमान वय 18 वर्षे पाहिजे

xvi. कार्ड नोंदणीसाठी कामाचा पुरावा कसा द्यायचा ?

उत्तर : पगार पावती तसेच बांधकाम कंत्राटदाराचे प्रमाणपत्र किंवा साईटवरील कामाचे छायाचित्र पुरावा म्हणून स्वीकारले जाते

xvii. बांधकाम व्यतिरिक्त कामगारांना हे कार्ड मिळू शकते का ?

उत्तर : नाही, हे कार्ड फक्त बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आहे इतर कोनालाही देता येत नाही

xviii. नोंदणी फॉर्म ऑनलाइन सबमिट झाल्यावर पुढे काय करावे ?

उत्तर : तुमच्या अर्जाची स्थिती तपासा आणि आवश्यक असल्यास कागदपत्रे जिल्हा ऑफिस मध्ये सादर करा

xix. नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक का आवश्यक आहे ?

उत्तर : अर्जाची स्थिती तसेच लाभांची माहिती आणि नूतनीकरण अलर्टसाठी मोबाईल क्रमांक आवश्यक आहे

xx. मुलांना शिष्यवृत्ती किती मिळते ?

उत्तर : प्राथमिक शिक्षणासाठी ₹2,000 ते ₹10,000 आणि उच्च शिक्षणासाठी ₹25,000 ते १ लाख रुपये पर्यंत मदत मिळते

xxi. महिला कामगारांसाठी विशेष फायदे कोणते आहेत ?

उत्तर : प्रसूती सहाय्य तसेच शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि वैद्यकीय सेवा महत्वाच्या आहेत

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना ? Bandhkam kamgar scholarship yojana

Bandhkam kamgar scholarship yojana : नमस्कार. शासन मार्फत महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात ज्यामध्ये त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

या प्रमुख योजनांचा मुख्य उद्देश बांधकाम कामगारांच्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे आहे

1. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेची वैशिष्ट्ये आणि लाभ याबद्दल माहिती पाहू

i. या साठी पात्रता

  • अर्जदाराचे पालक बांधकाम क्षेत्रात नोंदणीकृत असावे तसेच
  • कामगारांनी किमान 90 दिवसांचा कामाचा अनुभव असावा आणि
  • विद्यार्थ्याने किवा पाल्याने मान्यताप्राप्त शाळा/महाविद्यालयात प्रवेश घेतला असावा.

ii. लाभाचा प्रकार

  1. शाळा शिक्षणासाठी : 8वी ते 10वीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹2,000-₹3,000 पर्यंत आर्थिक मदत मिळते तसेच
  2. महाविद्यालयीन शिक्षणासाठी : 12वी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशनसाठी ₹5,000-₹25,000 पर्यंत शिष्यवृत्तीमिळते
  3. उच्च शिक्षणासाठी : वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ₹50,000 किंवा त्याहून अधिक रक्कम मिळते Bandhkam kamgar scholarship yojana

iii. सहाय्य प्रकार

  • ट्यूशन फी तसेच परीक्षा फी आणि शैक्षणिक साहित्याचा खर्च यासाठी मदत मिळते
  • वसतिगृह किंवा प्रवासाचा खर्च (गरजेनुसार) मिळते

iv. अर्ज प्रक्रिया कशी आहे ?

  • शिष्यवृत्ती साठी हा अर्ज कामगार कल्याण मंडळाच्या (Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board) अधिकृत वेबसाइटवर जाऊन करता येतो यासाठी
  • आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, कामगार नोंदणी प्रमाणपत्र, शाळेचा प्रवेश पत्र, बँक खाते तपशील इत्यादी

v. तांत्रिक लाभ

  • ऑनलाइन प्रक्रिया सोपी व पारदर्शक आहे
  • अर्ज केल्यानंतर एक निश्चित वेळेत शिष्यवृत्ती थेट बँक खात्यावर जमा होते

vi. योजनेचे फायदे

  • गरीब व मध्यमवर्गीय बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळतो तसेच
  • विद्यार्थ्यांना आर्थिक ताण न घेता शिक्षण सुरू ठेवता येते Bandhkam kamgar scholarship yojana
  • उच्च शिक्षणासाठी मदतीमुळे कामगारांच्या कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावतो
bandhkam Kamgar

2. शिष्यवृत्तीचा तपशील काही महत्वपूर्ण

i. पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती

  • प्रत्येक वर्षासाठी ₹20,000 शिष्यवृत्ती दिली जाते
  • ही शिष्यवृत्ती कामगाराच्या जास्तीत जास्त दोन पाल्यांना आणि नोंदणीकृत पुरुष कामगाराच्या पत्नीला लागू आहे यासाठी
  • विद्यार्थ्याने कोणत्याही वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा

ii. MS-CIT अभ्यासक्रमासाठी शुल्क प्रतिपूर्ती दिली जाते

  • बांधकाम कामगाराच्या दोन मुलांसाठी MS-CIT अभ्यासक्रमाचा खर्च परतावा दिला जातो त्यासाठी
  • प्रमाणपत्र आणि शुल्क पावतीची आवश्यकता असते​

iii. इतर फायदे

  • गंभीर आजारासाठी ₹1,00,000 पर्यंतची आर्थिक मदत दिली जाते
  • प्रसूतीसाठी ₹15,000 ते ₹20,000 मदत दिली जाते
  • अपंगत्वासाठी ₹2,00,000 ची आर्थिक मदत​ दिली जाते

iv. अर्ज प्रक्रिया

  • लाभ घेण्यासाठी अर्जदाराने Mahabocw च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज डाउनलोड करावा आणि
  • आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरून नजीकच्या श्रम आयुक्त कार्यालयात जमा करावा
  • कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, कामगार नोंदणी प्रमाणपत्र, बँक पासबुक, आणि शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची पावती त्यासाठी आवश्यक आहे​

v. बांधकाम कामगार या साठी पात्रता काय आहे ?

  1. अर्जदार किंवा पालकाने Mahabocw बोर्डामध्ये नोंदणी केलेली असावी
  2. कामगाराने मागील 12 महिन्यांमध्ये किमान 90 दिवस काम केलेले असावे
  3. त्याच्याकडे बँक पासबुक आणि आधार कार्ड असावे

3. बांधकाम कामगार ला तसेच त्याच्या पत्नीस प्रसूतीसाठी ₹15,000 ते ₹20,000 मदत दिली जाते

महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी किवा त्याच्या गर्भवती पत्नीस आर्थिक मदत MAHABOCW (Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board) अंतर्गत दिली जाते

या योजनेंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन जिवंत मुलांसाठी खालील प्रमाणे आर्थिक मदत मिळते

  1. सामान्य प्रसूतीसाठी ₹15,000 ची मदत मिळते
  2. सिझेरियन प्रसूतीसाठी ₹20,000 ची मदत मिळते

i. हा लाभ घेण्यासाठी अटी व पात्रता पहा

  • लाभार्थी महिला बांधकाम कामगार म्हणून MAHABOCW कडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे तसेच
  • नोंदणीसाठी मागील 12 महिन्यांत किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे सोबत फॉर्म भरताना
  • अर्जासोबत वैद्यकीय आणि नोंदणीचे आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे

ii. अर्ज कसा करावा

  • MAHABOCW च्या अधिकृत वेबसाइटवर (mahabocw.in) जाऊन ऑनलाइन अर्ज दाखल करता येतो
  • आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही जवळच्या कामगार सुविधा केंद्रात (WFC) प्रत्यक्ष जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येते​

Bandhkam Kamgar बांधकाम कामगार

नमस्कार, आज आपण बांधकाम कामगार संदर्भात माहिती पाहणार आहोत. बांधकाम कामगार हे कोणत्याही देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचा महत्त्वाचा घटक आहेत त्यांच्याद्वारे मेहनत इमारती तसेच पूल, रस्ते, आणि इतर पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये योगदान आहे.Bandhkam Kamgar

भारतासारख्या देशात, बांधकाम कामगारांची संख्या मोठी आहे परंतु त्यांच्या कामाच्या सुरक्षिततेसाठी, वेतनासाठी, आणि कल्याणासाठी अजूनही अनेक प्रश्न आहेत त्याबद्दल माहिती पाहू

1. बांधकाम कामगार कोण आहेत ?

बांधकाम कामगार हे ते लोक आहेत जे इमारती तयार करणे तसेच रस्ते बांधणे, पूल तयार करणे आणि पायाभूत सुविधा निर्माण करणे यासाठी शारीरिक परिश्रम हे करतात.

2. बांधकाम कामगारांचे प्रकार कोणते असतात ?

  • मजूर (Unskilled Workers)
  • कुशल कामगार (Skilled Workers)
  • तांत्रिक कामगार (Technical Workers)
  • पर्यवेक्षक (Supervisors)

3. बांधकाम कामगारांचा दिवस कसा असतो ?

बांधकाम कामगार दिवसाची सुरुवात लवकर करतात तसेच त्यांच्या कामामध्ये मालवाहतूक तसेच संरचना बांधकाम आणि कधीकधी धोकादायक कामे करतात.Bandhkam Kamgar

4. बांधकाम कामगारांच्या समस्या कोणत्या आहेत ?

  • अपुरे वेतन त्यांना मिळते त्याचबरोबर
  • कामाच्या ठिकाणी सुरक्षा समस्यां तसेच
  • सामाजिक सुरक्षा योजनांचा अभाव आणि
  • तात्पुरते रोजगार
Bandhkam Kamgar

5. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या अडचणी काय असतात ?

महिलांना समान वेतनाचा अभाव मोठा आहे तसेच शारीरिक आणि मानसिक छळ यासारख्या अडचणींचा सामना करावा लागतो.

6. बांधकाम कामगारांसाठी कोणत्या कल्याण योजना आहेत ?

सरकारतर्फे अनेक योजना आहेत जसे की Bandhkam Kamgar

7. बांधकाम कामगारांसाठी सुरक्षिततेची साधने कोणती आहेत ?

  1. हेल्मेट याचबरोबर
  2. सेफ्टी शूज
  3. बेल्ट्सहित मोजे आणी
  4. गॉगल्स

8. बांधकाम कामगारांचे पगार कसे ठरवले जातात ?

पगार कामाच्या प्रकारावर ठरवला जातो त्याच बरोबर कामगाराच्या कौशल्यावर आणि कामाच्या ठिकाणावर सुद्धा अवलंबून असतो.

9. बांधकाम कामगारांसाठी आवश्यक कायदे कोणते आहेत ?

  • बांधकाम कामगार कायदा, 1996
  • कामगार कल्याण अधिनियम
  • किमान वेतन कायदा

10. बांधकाम क्षेत्राचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो ?

बांधकाम क्षेत्र हे देशाच्या GDP च्या मोठ्या भागासाठी जबाबदार आहे आणि त्याचा रोजगार निर्मितीमध्ये मोठा वाटा आहे त्याचा मोठा परिणाम अर्थ व्यवस्थेवर होत असतो.

11. बांधकाम कामगार काही प्रश्न आणि उत्तरे

1. बांधकाम कामगार कोण आहेत ?

बांधकाम कामगार हे पायाभूत सुविधा उभारणाऱ्या मजुरांना म्हणतात त्यांचा सहभाग देशाच्या विकासात महत्त्वाचा आहे.

2. बांधकाम क्षेत्रात किती प्रकारचे कामगार असतात ?

कुशल, अकुशल, तांत्रिक, व पर्यवेक्षक, प्रत्येक प्रकार विशिष्ट जबाबदाऱ्या पार पाडतो.

3. बांधकाम कामगारांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो ?

कमी वेतन, सुरक्षिततेचा अभाव, व तात्पुरता रोजगार, यावर उपाय म्हणून कल्याण योजना व कायदे लागू आहेत.

4. महिला कामगारांना अधिक अडचणी का येतात ?

समान वेतन व सुरक्षिततेचा अभाव, महिलांसाठी स्वतंत्र कल्याण योजना लागू केल्या पाहिजेत.

5. कामाच्या ठिकाणी सुरक्षितता कशी राखली जाऊ शकते ?

हेल्मेट, सेफ्टी शूज, व गॉगल्स वापरून, कामगारांनी सुरक्षा उपकरणांचा वापर नियमित करावा.

6. सरकारच्या कोणत्या योजना बांधकाम कामगारांसाठी उपयुक्त आहेत ?

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, या योजनांमुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.

7. बांधकाम कामगारांच्या पगाराचे मोजमाप कसे होते ?

कौशल्य, अनुभव, आणि ठिकाणावर अवलंबून, स्थानिक प्रशासन हे नियमित करते.

8. बांधकाम कामगारांसाठी कायदे महत्त्वाचे का आहेत ?

अपघात आणि शोषण टाळण्यासाठी, यामुळे कामगारांना संरक्षण मिळते.

9. महिला कामगारांच्या सुरक्षेसाठी काय उपाय आहेत ?

स्वतंत्र टॉयलेट्स, विश्रांतीसाठी जागा, महिलांच्या गरजा लक्षात घेणे गरजेचे आहे.

कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य 2024 Bankam kamgar scholarship 1 lakh rupees

कामगार हा नेहमीच तुटपुंज्या पगारात आपले जीवन कंठत असतो. त्याचा मासिक उत्पन्न मर्यादित असल्याने कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सांभाळतानाच शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या उच्च खर्चाची पूर्तता करणे अवघड ठरते. Bankam kamgar scholarship 1 lakh rupees

विशेषतः वैद्यकीय शिक्षणाची गोष्ट आली तर प्रवेश शुल्क, शिक्षण साहित्य, पुस्तकांचा खर्च, परीक्षा शुल्क, तसेच हॉस्टेल व अन्य दैनंदिन खर्च या सर्व गोष्टींमुळे कामगार कुटुंबावर मोठा आर्थिक ताण येतो. परिणामी, बँकांकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरत नाही.

अशा परिस्थितीत कुटुंबाचा आर्थिक डोलारा सांभाळणे आणि कर्जाचे हफ्ते फेडणे ही मोठी आव्हान ठरते.

कामगार कल्याणकारी मंडळाचा पुढाकार

कामगार कुटुंबांवरील हा आर्थिक ताण लक्षात घेऊन कामगार कल्याणकारी मंडळाने एक अभिनव योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे कामगारांच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. bankam kamgar scholarship 1 lakh rupees

योजनेचे उद्दिष्ट

  • कामगारांच्या मुलांना व पत्नीला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
  • कुटुंबाच्या आर्थिक अडचणी कमी करत वैद्यकीय शिक्षणात प्रगती करण्यास प्रोत्साहन देणे.
  • आरोग्यसेवेमध्ये योगदान देण्यासाठी कामगार कुटुंबातील सदस्यांना सक्षम बनवणे.
  • कामगार कुटुंबांतील आर्थिक ताण कमी करून त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे.

योजनेची वैशिष्ट्ये

  1. थेट बँक खात्यात लाभ जमा होतो.
  2. कामगारांच्या मुलांना व पत्नीला शिक्षणासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी मदत.
  3. प्रत्येक वर्षी 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य.

योजनेच्या लाभार्थी

  • नोंदणीकृत कामगारांचे मुलगे/मुली.
  • पुरुष कामगारांच्या पत्नी.

आवश्यक अटी व शर्ती

  1. कामगार हा कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
  2. लाभार्थीने मान्यताप्राप्त महाविद्यालयात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.
  3. वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  4. विद्यार्थ्याने दरवर्षी किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  5. जर कामगाराचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या पत्नी/मुलांना योजनेसाठी अर्ज करता येईल.

आवश्यक कागदपत्रे

  • मागील शैक्षणिक वर्षातील गुणपत्रक.
  • चालू वर्षाच्या प्रवेशाची पावती किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र.
  • कामगाराचे नोंदणी प्रमाणपत्र.
  • कुटुंबीयांचे आधार कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला.
  • प्रवेश घेतलेल्या संस्थेचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र.
Bankam kamgar scholarship 1 lakh rupees

अर्ज करण्याची पद्धत

  1. अर्ज डाउनलोड करा: योजनेसाठी अधिकृत लिंकवरून अर्ज डाउनलोड करावा.
  2. सर्व माहिती भरा: अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे संलग्न करा.
  3. अर्ज जमा करा: अर्ज तुमच्या क्षेत्रातील कामगार कल्याण कार्यालयात जमा करा.

ही योजना केवळ आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठीच नव्हे तर कामगार कुटुंबांतील सदस्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोठा हातभार ठरत आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी मिळालेली मदत केवळ त्यांच्या स्वप्नांना पंख देत नाही तर कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यालाही आधार देते.

कामगार कल्याण वैद्यकीय शिष्यवृत्ती योजना हे कामगारांच्या प्रगतीचे एक महत्त्वाचे पाऊल असून, त्यांच्या पुढच्या पिढीला उज्ज्वल भविष्याकडे नेणारा मार्ग आहे.

प्रश्न आणि उत्तरे

प्रश्न 1: कामगारांना आर्थिक ताण का येतो ?

उत्तर : कामगारांचे उत्पन्न तुटपुंजे असल्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या उच्च खर्चाची पूर्तता करणे कठीण होते. यात प्रवेश शुल्क, पुस्तकांचा खर्च, परीक्षा शुल्क, हॉस्टेल व जेवणाचा खर्च यांचा समावेश होतो. परिणामी, बँकांकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची वेळ येते, ज्यामुळे कुटुंबावर मोठा आर्थिक ताण निर्माण होतो.

प्रश्न 2 : कामगार कल्याणकारी मंडळाने कोणती योजना सुरू केली आहे ?

उत्तर : कामगार कल्याणकारी मंडळाने “कामगार कल्याण वैद्यकीय शिष्यवृत्ती योजना” सुरू केली आहे, ज्यामध्ये कामगारांच्या मुलांना व पत्नीला वैद्यकीय शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.

प्रश्न 3 : या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?

  1. कामगारांच्या मुलांना व पत्नीला वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य पुरवणे.
  2. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबू नये, याची काळजी घेणे.
  3. आरोग्यसेवेमध्ये कामगार कुटुंबातील सदस्यांचे योगदान वाढवणे.
  4. कुटुंबावरील आर्थिक भार कमी करणे.

प्रश्न 4 : या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत ?

  1. थेट बँक खात्यात लाभ जमा केला जातो.
  2. प्रति शैक्षणिक वर्ष 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
  3. आर्थिक सहाय्य वैद्यकीय शिक्षणासाठी तसेच साहित्य खरेदीसाठी दिले जाते.

प्रश्न 5 : या योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?

उत्तर :

  1. नोंदणीकृत कामगारांचे मुले (मुलगा/मुलगी).
  2. पुरुष कामगारांच्या पत्नी.

प्रश्न 6 : या योजनेअंतर्गत वैद्यकीय शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी कोणत्या अटी लागू होतात ?

उत्तर :

  1. कामगार हा कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
  2. विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त महाविद्यालयात वैद्यकीय पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा.
  3. कामगाराचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे.
  4. विद्यार्थी प्रत्येक वर्षी किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  5. जर कामगाराचा मृत्यू झाला असेल, तर त्याच्या पत्नी/मुलांना अर्ज करता येतो. bankam kamgar scholarship 1 lakh rupees

प्रश्न 7 : अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?

उत्तर :

  1. मागील शैक्षणिक इयत्तेचे गुणपत्रक.
  2. चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेशाची पावती किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र.
  3. कामगाराचे नोंदणी प्रमाणपत्र.
  4. उत्पन्नाचा दाखला.
  5. आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, व शैक्षणिक प्रमाणपत्रे.

प्रश्न 8 : अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?

उत्तर :

  1. अर्ज अधिकृत लिंकवरून डाउनलोड करावा.
  2. आवश्यक माहिती भरून, कागदपत्रे संलग्न करावी.
  3. अर्ज संबंधित कामगार कल्याण कार्यालयात जमा करावा.

प्रश्न 9 : कामगार कल्याण वैद्यकीय शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ?

उत्तर : कामगार कुटुंबातील मुलांना व पत्नीला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणे व त्यांच्या आर्थिक अडचणी कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रश्न 10 : या योजनेमुळे कामगार कुटुंबांवर काय परिणाम होतो ?

उत्तर :

  • कुटुंबावरील आर्थिक ताण कमी होतो.
  • मुलांना व पत्नीला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते.
  • आरोग्य सेवांमध्ये त्यांचे योगदान वाढते, ज्यामुळे कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल होते.

कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी Bandhkam Kamgar list

  1. बांधकाम व दुरुस्ती कार्य
    • इमारती
    • रस्ते आणि रेल्वे
    • एअरफील्ड
    • ट्रामवेज
    • सिंचन आणि ड्रेनेज
  2. विशेष प्रकारची बांधकामे
    • तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स
    • स्टॉर्म वॉटर ड्रेनेज
    • डॅम, नद्या, व नाशक संरचना
  3. ऊर्जा आणि दळणवळण प्रकल्प
    • पॉवर वितरण आणि पारेषण
    • पाणी वितरणासाठी चॅनल
    • तेल आणि गॅस पाईपलाइन
    • वायरलेस, दूरदर्शन, इलेक्ट्रिक लाईन्स, रेडिओ
    • टेलीफोन, टेलीग्राफ, ओव्हरसीज कम्युनिकेशन्स Bandhkam Kamgar list
  4. प्रमुख बांधकामे
    • टनेल, पुल, जलविद्युत प्रकल्प
    • ट्रान्समिशन टॉवर्स, कूलिंग टॉवर्स
  5. मजुरी व शिल्प कार्य
    • दगड कापणे, फोडणे व चुरा तयार करणे
    • लादी व टाईल्स कापणे आणि पॉलिश करणे
  6. सजावटीचे व अंतर्गत काम
    • रंगकाम, वॉर्निश व सुतारकाम
    • काच कापणे, तावदाने बसविणे
    • प्लास्टर ऑफ पेरीस व आभासी छत बसविणे
  7. विद्युत आणि यांत्रिक कामे
    • वितरण, वायरिंग, तावदान बसविणे
    • अग्निशमन आणि वातानुकूलन यंत्रणा बसविणे व दुरुस्ती
    • उद्वाहने व स्वयंचलित जिने बसविणे
  8. लोखंड व धातूशी संबंधित कार्य
    • खिडक्या, ग्रिल्स, दरवाजे तयार करणे व बसविणे
  9. जलसंधारण आणि जलस्रोत प्रकल्प
    • जलसंचयन संरचना व जलतरण तलाव
  10. मनोरंजन आणि सुविधा निर्माण
    • खेळाचे मैदान, गोल्फ मैदान
    • सार्वजनिक उद्याने व रमणीय भू-प्रदेश
  11. विशेष यंत्रणा व उपकरणे
    • सौर तावदाने व ऊर्जाक्षम उपकरणे
    • माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवासी निवारे
  12. अन्य विशेष कार्य
    • रोटरीज बांधणे, कारंजे बसविणे
    • सिमेंट काँक्रीट साचे तयार करणे

वरील यादीतील प्रत्येक कार्य हे मान्यताप्राप्त आहे आणि योग्यरित्या पार पाडण्यासाठी तांत्रिक कौशल्याची आवश्यकता आहे.Bandhkam Kamgar list

bandhkam kamgar registration new

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना 2024

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना : महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, या मंडळामार्फत बांधकाम कामगारांना मध्यान भोजन योजना ही सुरू केली आहे. या मध्यान भोजन योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दोन वेळेस सकस आहार दिला जातो. या मध्यान्ह भोजन सकस आहारामध्ये भाजी, चपाती, भात, डाळ, लोणचे आणि गुळ हा आहार दिला जात आहे.

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना : महाराष्ट्र राज्यामध्ये कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. बांधकाम कामगार हे कामानिमित्त वेगवेगळे ठिकाणी स्थलांतरित होत असतात. बांधकाम कामगार मध्ये संख्या ही ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर आहे. ग्रामीण भागातील कामगार हे स्थलांतरित मोठ्या प्रमाणावर शहरी भागात होत असतात. या ठिकाणी आल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित नसते तसेच जेवण त्यांना व्यवस्थित मिळत नाही.

बांधकाम कामगार यांचा जास्त वेळ हा कामाच्या ठिकाणी जात असतो. त्यांची दिनचर्या ही सकाळपासून सुरुवात होत असते आणि संध्याकाळपर्यंत हे काम चालू असते. काम हे जडिपाचे असल्याकारणाने त्यांना व्यवस्थित जेवण बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. जेवण व्यवस्थित मिळत नसल्याने त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. आणि त्यांना जी मजुरी मिळते ती खूपच अत्यल्प असते. या कारणामुळे बांधकाम कामगारांमध्ये मोठे कुपोषणाचे प्रमाण सापडलेले आहे.

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना bandhakam-kamagar-madhyanh-bhojan-yojana

ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने ‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करून या बांधकाम कामगारांना दोन वेळेस सकस आहार त्यांच्या कामाच्या ठिकाणी मिळावा यासाठी ‘ बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना ‘ या योजनेची सुरुवात केली. या बांधकाम कामगार मध्यान भोजन योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना आता चालू कामाच्या ठिकाणी दोन वेळचे सकस आहार दिला जातो.

दिवसातून हा आहार दोनदा दिला जातो. हा सकस आहार घेऊन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांची गाडी ही बांधकाम कामगाराच्या कामास ठिकाणी जात असते. मध्यान्ह भोजन घेऊन ही गाडी सकाळी १०:३० ते १२:०० दरम्यान एकदा येते. त्यानंतर हीच गाडी त्याच दिवशी सकस आहार जेवण घेऊन ०४:३० ते ०६:०० च्या दरम्यान येते.

बांधकाम कामगाराची गाडी ही शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी तुमच्या साईटचे काम चालू आहे त्या ठिकाणी जाते. किंवा तुम्ही जर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येत असाल तर ही गाडी जेवण घेऊन तुमच्या ग्रामपंचायत मध्ये येते. त्या ठिकाणी तुम्ही दोन जेवण घेऊ शकता.

बांधकाम-कामगार-मध्यान्ह-भोजन-योजना

जर बांधकाम कामगार असाल, तर मध्यान्ह भोजन योजनेसाठी तुम्ही मंडळाकडे अर्ज करू शकता. अर्ज करण्याची पद्धत खूप सोपी आहे. ज्या ठिकाणी 5 ते 15 कामगार काम करत असतील तर त्यांनी ग्रुपमध्ये जाऊन मंडळाकडे मध्यान भोजन योजने संदर्भात अर्ज जमा करायचा आहे. त्यानंतर अगदी पाच ते दहा दिवसाच्या आत तुमच्याशी संपर्क साधून ही गाडी मध्यान भोजन सकसार घेऊन त्या साइटवर येईल. अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. काही महत्त्वाच्या कागदपत्रासह तुम्ही मध्यान भोजन योजना यासाठी मंडळाकडे अर्ज करू शकता.

  • बांधकाम कामगाराचे कार्ड
  • आधार कार्ड
  • नूतनीकरण झाले असेल तर नूतनीकरण पावती
  • मोबाईल नंबर
  • ग्रामपंचायत हद्दीमध्ये असाल ग्रामपंचायत चे मध्यान भोजन चालू होण्यासंदर्भात ठराव सर्वांच्या सहीने.
  • जर काम साइटवर असेल, ठेकेदार या मार्फत असेल अथवा काम हे इंजिनियर मार्फत असेल तर सर्व कामगारांची यादी आणि त्यावर त्या इंजिनियर ची सही आणि शिक्का आणि काम कोठे चालू आहे त्या संदर्भात तपशील.
  • स्वयंघोषणापत्र

बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना bandhakam-kamagar-madhyanh-bhojan-yojana

बांधकाम कामगार मध्यान भोजन योजना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही नियम व अटी आहेत ते खालील प्रमाणे

  • मध्यान्ह भोजन योजना हा लाभ मिळवण्यासाठी बांधकाम कामगार व इतर कामगार म्हणून त्यांची नोंद ही महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाकडे झालेली असावी.
  • मध्यान्ह भोजन योजना मिळवण्यासाठी त्या बांधकाम कामगाराकडे ‘ मंडळाचे स्मार्ट कार्ड असावे ‘.
  • मध्यान्ह भोजन योजना मिळवण्यासाठी त्या बांधकाम कामगाराकडे आधार कार्ड असावे.
  • मध्यान्ह भोजन योजना मिळवण्यासाठी बांधकाम कामगाराची ‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे ‘ नोंदणी ही सक्रिय असावी.
  • मध्यान्ह भोजन योजना मिळवण्यासाठी बांधकाम कामगार हा कोणत्यातरी साइटवर कामाला पाहिजे.
योजनेचे नाव बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना
योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या मार्फत
लाभ दोन वेळचे बांधकाम कामगारांना जेवण
खर्च काहीच नाही
अर्जबांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना चालू करण्यासाठी अर्ज येथे मिळवा
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. रेशन कार्ड
  4. 90 दिवसाचे ग्रामसेवक अथवा ठेकेदाराचे प्रमाणपत्र

बांधकाम कामगार नवीन नोंदणी Workers Registration

बांधकाम कामगार नवीन नोंदणी Bandhkam Kamgar registration : महाराष्ट्र मध्ये कामगार संदर्भात विविध जनगणना झालेले आहेत. सन 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात 14.09 लाख ( अंदाजे ) बांधकाम मजूर आहेत. सन 2001 नुसार जर राज्यामध्ये 14.09 लाख बांधकाम कामगार असतील तर 2011 मध्ये ही संख्या 17.50 लाख एवढे झाले असणार आहे. अर्थात 2021 मध्ये ही संख्या 25 ते 30 लाख झाली असणार आहे.

बांधकाम कामगार नवीन नोंदणी Bandhkam Kamgar registration : महाराष्ट्र राज्यामध्ये 2001 जनगणनेनुसार जर 14.09 लाख बांधकाम कामगार असतील तर या कामगारासाठी कल्याणकारी योजना राबवणे हे राज्य शासनाचे तसेच सत्ताधाऱ्यांचे प्रथम कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी योजना राबवणे तसेच समस्या सोडवण्यासाठी 1 मे 2011 रोजी कामगार दिनाचे औचित्य साधून ‘ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ‘ याची स्थापना केली.

बांधकाम कामगार नवीन नोंदणी bandhkam-kamgar-registration

महाराष्ट्र मध्ये 2016 अखेर 5.65 लाख बांधकाम कामगार मंडळाकडे लाभार्थी म्हणून नोंदणी झालेली आहे. आता यामध्ये 2024 पर्यंत 28 ते 35 लाख लाभार्थ्यांची नोंदणी मंडळाकडे झाली आहे. यापैकी 15 ते 20 लाख एवढी सक्रिय नोंदणी आहे.

Bandhkam Kamgar registration Eligibility : बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण पात्रतेची आवश्यकता आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. फक्त बांधकाम कामगारांनाच यामध्ये नोंदणी करता येणार आहे. जे बांधकाम कामगार नाहीत त्यांनी या ठिकाणी नोंदणी करू नये. खालील प्रमाणे महत्त्वाचे निकष आहेत

  1. बांधकाम कामगारांचे वय हे 18 ते 60 वर्ष या दरम्यान पाहिजे.
  2. मागील वर्षी म्हणजे मागील 12 महिन्यांमध्ये बांधकाम कामगाराने 90 दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेले पाहिजे.
महाराष्ट्र कामगार नोंदणी Maharashtra worker registration mahabocw

बांधकाम कामगार नवीन नोंदणी Bandhkam Kamgar registration Document : बांधकाम कामगार नवीन नोंदणीसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

  1. अर्ज
  2. वयाचा पुरावा -आधार कार्ड/पॅन कार्ड
  3. रहिवासी पुरावा – आधार कार्ड/ रेशन कार्ड
  4. पासपोर्ट साईज चे 3 फोटो.
  5. 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र.

नोंदणी फी म्हणून 01 रुपया व वार्षिक वर्गणी 01 रुपया

bandhkam kamgar registration new

बांधकाम कामगार नवीन नोंदणी Bandhkam Kamgar registration Contact information : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे तुम्ही खालील प्रमाणे संपर्क करू शकता.

  • दूरध्वनी क्रमांक : 022 2657 2631 / 022 2657 2632
  • ई-मेल आयडी : bocwwboardmaha@gmail.com / info@mahabocw.in
  • टोल फ्री क्रमांक : ( सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत ) : 1800 8892 816
  • संपर्क कार्यालय : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ( पाचवा मजला, एम एल टी सी हाऊस, प्लॉट C- 22, ई ब्लॉक , वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे ( पूर्व ), मुंबई 400051, महाराष्ट्र
Bandhkam Kamgar Yojana
bandhkam kamgar registration online
bandhkam kamgar registration online
bandhkam kamgar registration online
Exit mobile version